औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू, राज ठाकरेंची सभा रद्द होणार?  

औरंगाबाद – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे यांची येत्या १ मे रोजी औरंगाबादेत सभा होणार आहे. २६ एप्रिल ते ९ मे या काळात औरंगाबादमध्ये पोलिसांनी जमावबंदीचा आदेश काढला आहे. यावर मनसे नेते याबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागेल आहे.

औरंगाबादमध्ये १ मे रोजी होणार मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या होणारी सभा पोलिसांच्या आदेशामुळे रद्द करावी लागणार आहे. महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची सभा होणार असताना पोलिसांनी औरंगाबादमध्ये ९ मेपर्यंत जमावबंदीचा आदेश प्रसिद्ध केला आहे. सणवार तसंच विविध आंदोलनांची कारणं देत पोलिसांनी ही जमावबंदी लागू केली आहे. आदेशामध्ये मनसेने मशिदींवरील भोंगे काढण्यासंबंधी दिलेल्या इशाऱ्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे पोलिसांनी परवानगी दिल्याशिवाय मनसे सभा घेऊ शकत नाही हे स्पष्ट आहे.

दरम्यान, मनसेकडून राज ठाकरेंच्या सभेचा टीझर प्रसिद्ध कऱण्यात आला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरला टीझर शेअऱ केला आहे. मनसेने टीझरमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच केला असून चलो संभाजीनगर अशी घोषणा दिली आहे. या टीझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेतील काही वक्तव्यांचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये राज ठाकरे आपण धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचं सांगत आहेत.

Protected Content