जात प्रमाणपत्राबाबत अकरावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई प्रतिनिधी | अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू असतांनाच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जात प्रमाणपत्राबाबत दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

 

अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी आजपासून सुरु होतं आहे. तथापि, अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना जात प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यानं अडचणी निर्माण होत होत्या. शालेय शिक्षण विभागानं यासंदर्भात दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र नसेल ते विद्यार्थी तात्पुरत्या स्वरुपात वडिलांचं जात प्रमाणपत्र सादर करु शकतात.

स्वतःचे जात प्रमाणपत्र नाही,अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत अडचण येऊ नये यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करून तात्पुरता प्रवेश घेण्याची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे.

Protected Content