विद्यापीठात रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गीतगायन आणि काव्यवाचन स्पर्धा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेअंतर्गत असलेल्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाच्या वतीने गीतगायन व काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली.

व्य.प. सदस्य डॉ. पवित्रा पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा. अजय पाटील अध्यक्षस्थानी होते. सुकन्या जाधव आणि माधुरी जाधव यांना विभागून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. अमृता महाजन द्वितीय तर राखी शेंडगे हिने तृतीय क्रमांक मिळवला. दामिनी पाटील व गोपाल पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. परीक्षक म्हणून डॉ. अभय मनसरे, डॉ. बाळासाहेब सुर्यवंशी यांनी काम पाहिले. डॉ. पवित्रा पाटील नितीन सांगवी व डॉ. उमेश गोगडीया यांच्या हस्ते पारीतोषिके देण्यात आली. डॉ. विजय घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. सुकन्या जाधव हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले डॉ. समाधान बनसोडे यांनी आभार मानले.

Protected Content