Injured : ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्यासह मुलगा जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील भादली ते भोलाणे रोडवर ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्यासह त्यांचा मुलगा जखमी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ट्रॅक्टरचालकाविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, भोलाणे येथील सदाशिव कोळी, त्यांची पत्नी सुनिता व मुलगा कुणाल हे तिघेही १५ एप्रिल रोजी त्यांच्या (एमएच १९ बीएस ६१९६) या क्रमाकांच्या दुचाकीवरुन जात होते. यादरम्यान भादली ते भोलाणे गावादरम्यान सखाराम पाटील यांच्या शेताजवळ (एमएच १९ सीझेड ५२२४) या क्रमाकांच्या ट्रॅक्टरने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सदाशिव कोळी, त्यांची पत्नी व मुलगा तिघेही रस्त्याच्या बाजूला फेकले जावून तिघांनाही दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याप्रकरणी शनिवारी सुनिता सदाशिव कोळी (वय ३०) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ट्रॅक्टर चालक भिकन कौतिक पाटील याच्याविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधाकर शिंदे हे करीत आहेत.

Protected Content