Home क्राईम विवाहितेच्या विनयभंग : एकावर गुन्हा दाखल

विवाहितेच्या विनयभंग : एकावर गुन्हा दाखल

0
55

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात शौचास गेलेल्या विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या एकाजणांविरुद्ध जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात १५ एप्रिल रोजी विवाहिता तिच्या देराणीसोबत शौचास जात असतांना प्रवीण उर्फ  रावसू दिलीप काळे याने मागून पकडले. त्यानंतर तू मला आवडते, माझ्यासोबत शरीर संबंध ठेव, असे बोलून स्त्री मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. एवढेच नव्हे तर, याबाबत कुणाला सांगितले तर तुला सोडणार नाही, असे बोलून पळून गेला. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन शनिवारी प्रवीण काळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लीलाधर महाजन हे करीत आहेत.


Protected Content

Play sound