विद्यापीठात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील येणार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ९ फेब्रुवारी २०२४ रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील येणार आहेत. त्यांच्या हस्ते पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे आणि नव्याने सुरु झालेल्या योगशास्त्र पदव्युत्तर विभागाचे उद्घाटन होणार आहे.

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी असून प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांची उपस्थिती असणार आहे. उद्घाटनानंतर मुख्य सोहळा दुपारी १२ वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

Protected Content