यावल महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा

 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पसंख्यांक हक्क दिवस महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील होते तर प्रमुख वक्ते यावल येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील हिंदी विषयाचे प्रा. एम. वाय. शेख होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. पाटील यांनी म्हटले की आपला भारत देश विविध जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा असलेला देश असून एक संघ आहे. विविध जाती धर्माचे सर्व नागरिक एकत्रित विविध सण साजरे करतात आणि गुण्यागोविंदाने राहतात. अल्पसंख्यांक नागरिकांसाठी विविध योजना असतात या योजनांचा अभ्यास करून याचा उपयोग समाजातील वंचित नागरिकांसाठी करावा असे मार्गदर्शन केले.

प्रमुख वक्ते प्रा. शेख यांनी अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त अल्पसंख्यांक नागरिकांचे विविध हक्क व योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अल्पसंख्यांक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यांनी विविध योजनांचा आपापल्या समाजातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत योजना पोहोचून याचा सदुपयोग करावा असे आवाहन केले.

कार्यक्रमात डॉ सुधा खराटे, डॉ. एस. पी. कापडे, डॉ. एच जी भंगाळे, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा गणेश जाधव आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्दू विभागाचे प्रा. मोहसीन खान यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. डी. पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, प्रमोद भोईटे, नवमेश्वर तायडे आदींनी सहकार्य केले.

Protected Content