चोपडा येथील प्रताप विद्या मंदिरात राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा

pratap vidyalay chopda news

चोपडा प्रतिनिधी । येथील प्रताप विद्या मंदिरात राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सोसायटीच्या सचिव माधुरी मयूर यांच्याहस्ते करण्यात आले.

त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, गणितीय संकल्पना सोप्या करून गणित हा विषय विद्यार्थ्यांना सोपा व जिव्हाळ्याचा करता येऊ शकतो, गणितातील विविध संकल्पना विद्यार्थ्यांच्या कृतियुक्त सहभागातून समजावून देता येतात, विद्यार्थ्यांसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांतून आपण ते साध्य करून देऊ शकतो, विद्यार्थ्याचा जो सहभाग व उत्साह आजच्या विविध गुणदर्शांनातून  दिसून आला. त्यातून एक नक्की कळते की भविष्यात भारतीय गणीतज्ञ म्हणून प्रताप विद्या मंदिराचे विद्यार्थी  ओळखले जाऊ शकतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना खरी प्रेरणा मिळते, असे भाषणात व्यक्त केले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती

यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतीय गणितज्ञ यांच्या चित्रप्रदर्शनाचे अनावरण करण्यात आले, गणितातील भौमितिक आकार फुगे लावून आकाशात मान्यवरांच्या हस्ते सोडण्यात आले, यावेळी मराठी व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यानी मॅथ मे डब्बा गूल गीत , सातचा पाढा (गीत), रामानुजन यांचा जीवन परिचय सांगणारे गीत तसेच विविध मॉडेल्स वापरुन गणितीय संकल्पना स्पष्ट करून देणारे प्रात्यक्षिके विद्यार्थ्यानी सादर केले. याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर, संस्थेचे समन्वयक  गोविंदभाई गुजराथी, विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. व्ही. याज्ञिक, उपमुख्याध्यापक डी. के. महाजन, नागलवाडीचे मुख्याध्यापक ए. ए. ढबू, उपप्राचार्य जे. एस. शेलार, पर्यवेक्षक जी. वाय. वाणी, वाय. एच. चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाय. एच. चौधरी यांनी केले, सूत्रसंचालन रोहन पाटील तर आभार  किरण पाटील यांनी मानले.

Protected Content