प्रश्न मंजूषा स्पर्धेत मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी) ।  एचआयव्ही-एड्स विषयी प्रश्न मंजुषा स्पर्धेत मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालयातील प्रविण पवार आणि अनुप जावळे यांनी प्रथम क्रमांक मिळविले आहे. आ. शिरीष चौधरी यांनी त्याचा सत्कार करुन त्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

सविस्तर माहिती अशी की,  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई व जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग, सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकिय माहाविद्यालय जळगाव मार्फत आयोजित एचआयव्ही-एड्स विषयी प्रश्न मंजुषा स्पर्धेत फैजपुर येथिल लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रविण संजय पवार, अनुप रविद्र जावळे यांनी प्रथम क्रमांक सह ५ हजार रुपयाचे बक्षिस मिळवत सुयश संपादन केले आहे.

एचआयव्ही-एड्स विषयी प्रश्न मंजुषा स्पर्धा नुकतीच जळगाव येथील सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकिय माहाविद्यालयात संपन्न झाली. या स्पर्धेत आरसीसी क्लब स्थापन केलेल्या १५ ते २० महाविद्यालयातील प्रत्येकी २ दोन विद्यार्थीनी सहभाग नोंदवला होता. यात लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालयातील एम फार्मचे द्वितीय वर्षातील विद्यार्थी प्रविण संजय पवार, अनुप रविद्र जावळे यांनी प्रथम क्रमांक सह ५ हजार रुपयाचे बक्षिस मिळवत सुयश मिळविले. विजयी स्पर्धक यांना जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रविण संजय पवार, अनुप रविद्र जावळे हे दोघे विजयी स्पर्धक मुंबई येथे होणाऱ्या विभागिय स्पर्धेत सहभागी होतील. या अनुशगांने आ. शिरीष चौधरी यांनी त्याचा सत्कार करुन त्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.  प्रविण पवार व अनुप जावळे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. आर. पाटील, उपप्राचार्य आर. वाय. चौधरी, प्रा. सचिन राणे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन मिळाले. प्रविण पवार हा भडगाव येथील जेष्ठ पत्रकार संजय पवार यांच्या मुलगा आहे. या निमित्ताने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

Protected Content