हिरवा सातपुडा अभियान यशस्वी करण्याचा निर्धार

faizapur

फैजपूर प्रतिनिधी । दिवसेंदिवस ऋतुचक्र बदलत चालले असून, आताच जागे होऊन वसुंधरेला हिरवा शालू परिधान करुया, नाही तर भविष्यकाळ अत्यंत प्रतिकूल असून, मानवाचा विनाश निश्चितच आहे. प्रत्येकाने निसर्ग संवर्धनासाठी खारीचा वाटा उचलला पाहिजे, असे मत प्राचार्य डॉ.पी.आर चौधरी यांनी धनाजी नाना महाविद्यालयात व्यक्त केले.

कै. लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त साधून वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी विविध बिया गोळा करून माती व शेणाचे मिश्रणमध्ये टाकून सुमारे 900 सिड बॉल तयार केले व दि. 10 जुलै बुधवार रोजी सातपुड्याच्या पायथ्याशी चिंचटी ता. रावेर गावाजवळ पडीत जमिनीत रोपून वृक्षरोपन करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख प्रा.डॉ.डी.ए.कुमावत, प्रा.डी.आर.तायडे, प्रा.डॉ.नितीन चौधरी, प्रा.डॉ.जयश्री पाटील, प्रा.डॉ.सरला तडवी, प्रा.शिवाजी मगर, प्रा.तोसिफ शेख, प्रा.शाहरुख मणियार, संतोष तायडे, आर.आर.जोगी, हुसेन तडवी, दिलीप मेढे आणि तृतीय वर्ष विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाबद्दल तापी परिसर विद्या मंडळचे अध्यक्ष मा. शिरिष चौधरी, उपाध्यक्ष प्रा.डॉ.एस.के. चौधरी, चेअरमन लिलाधर चौधरी व महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.पी.आर. चौधरी तसेच उपप्राचार्य यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

Protected Content