तीन महिन्यानंतर ‘त्या’ बाळाला दत्तक दिले देणार – सपना श्रीवास्तव (व्हिडीओ)

samtol prakalp

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ येथे वाराणसी- मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्सप्रेस मध्ये एका महिलेने आपल्या अडीच ते तीन महिन्याच्या बाळाला बेवारस सोडून दिले. बेवारस स्थितीत हे बाळ आढळल्याने समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. येत्या तीन महिन्यात संबंधित बाळाचे कोणतेही नातेवाईक न मिळाल्यास त्या बाळाला दत्तक म्हणून देण्यात येणार असल्याची माहिती समतोल प्रकल्पाच्या सपना श्रीवास्तव यांनी लाईव्ह ट्रेडस् न्यूजशी बोलतांना सांगितले.

वाराणसीहून मुंबईकडे जाणाऱ्या काशी एक्सप्रेस मध्ये अज्ञात महिलेने आपल्या बाळाला बेवारस सोडून दिले. स्लीपर कोच मधे हे बाळ बेवारस स्थितीत प्रवाशांना आढळून आले. याबाबत भुसावळ रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी संपूर्ण गाडीत या बाळाच्या आईचा शोध घेतला. मात्र कुठे ही आढळून ना आल्याने अखेर रेल्वे पोलिसांनी या बाळाला आपल्या स्वाधीन घेऊन जळगाव येथील बालसुधारगृहात या बाळाला पाठविण्यात आले. अज्ञात महिलेने या बाळाला काशी एक्सप्रेस मध्ये रविवारसोडून दिल्याचा प्राथमिक अंदाज रेल्वे पोलिसांनी वर्तवला असून लोहमार्ग पोलीस या अज्ञात महिलेचा शोध घेत आहे.

Add Comment

Protected Content