बोरघाटात दरोडा: लाखोंचा ऐवज लंपास

Crime l 1

रावेर प्रतिनिधी । रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील बोरघाटात दोन दिवसांपुर्वी रात्री 10 वाजेच्या सुमारास पांगरेचे झाड आडवे टाकून दरोडेखोरांनी मारहाण करून चाकूचा धाक दाखवून ३ लाखांचा मुद्देमाल लुटून नेल्याने परीसरात दहशत निर्माण झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बोरघाटातील चोरवाला घाटापुढे विही पॉईंटजवळ बारा ते पंधरा दरोडेखोरांनी 25 मे रोजी रात्रीच्या १० वाजे सुमारास जी वाहने आली त्यांना थांबवून मारहाण केली. सावदा या गावाकडून येणारे अमोल धनराज चव्हाण यांचे रोख २४०० व सोन्याचे लाकेट ब्रेसलेट, विकास खेमचंद चव्हाण पिकप नं (एमएच २८ १७८९) यांचे ७० हजार रोख रक्कम, विष्णू भोई यांचे ९५० रुपये व एक कट्टा फुटाणे, धुळ्याकडून खरगोनला जाणारे एका ट्रॅक चालक यास दगड मारून थांबविले. त्याच्या जवळून ३२ हजार रुपये हिसकावून घेतले. सुधाकर धांडे हे आपल्या भावाकडे जात असतांना गाडीत त्यांच परिवार होता त्यानंचे ३० हजार रुपये रोख व ७० हजार रुपये किंमतीचे सोनेचे दागिने जबरीने लुटले. वनविभागचे अमोल चव्हाण यांना मारहाण करण्यात आली. असा लुटमार करीत सोनेचे दागिन्यांसह दरोडेखोरांनी तब्बल ३ लाखाचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. परिसरात या दोड्याची घटना घडल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरोडेखोरांनी अक्षरशा रोडवरील धुमाकूळ घातला होता

सावदा पोलिसांना कोणताही सुगावा हाती लागला नाही सावदा पोलीसकडून आगोदर झालेल्या घटनेच्या गुन्ह्याचा तपास लागत नाही. तर दुसरीकडे दरोडेखोरांचे आव्हान आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. सावदा ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add Comment

Protected Content