३ हजाराची लाच घेताना विरवाडेचा पोलीस पाटील अडकला

जळगाव, प्रतिनिधी । प्रेयसीशी भांडण झाल्यावर हा वाद पोलीस ठाण्यात जाऊ नये म्हणून प्रियकराला दबावात घेऊन त्याच्याकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील पोलीस पाटील महारू कोळी याला आज लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने सापळा रचून अटक केली .

या भांडणात प्रियकराला पोलीस पाटलाने वादाची माहिती पोलिसांना न देण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी केली होती . फिर्यादीची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाच – लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती . सापळा रचून पंचासमक्ष ही लाच विरवाडे येथे स्वीकारताना पोलीस पाटलाला अटक करण्यात आली. या सापळा पथकात डी वाय एस पी गोपाळ ठाकूर , पोलीस निरीक्षक निलेश लोधी आणि संजोग बच्छाव , पो ना मनोज जोशी , प्रवीण पाटील , पोकॉ.नासिर देशमुख यांचा समावेश होता .पुढील तपास पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव करीत आहेत . पोलीस अधीक्षक सुनील कडासने , अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचण्यात आला होता .

कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव ( दुरध्वनी क्रं. 0257-2235477, मोबा.क्रं. 9607556556) वर संपर्क साधावा., असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने केले आहे

Protected Content