Home आरोग्य राज्यात परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे संसर्ग वाढतोय : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

राज्यात परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे संसर्ग वाढतोय : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात


सोलापूर (वृत्तसंस्था) कोरोनाचे संकट ऐतिहासिक आहे. राज्यात परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे संसर्ग वाढत आहे. मुंबई कंट्रोलमध्ये असले तरी इतर शहरात संसर्ग वाढत असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. ते सोलापूर जिल्हा नियोजन भवनमध्ये कोरोना विषाणूच्या आढावा बैठकीत बोलत होते.

 

 

यावेळी थोरात म्हणाले की, सोलापूर शहरात सध्या रूग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. ही आनंदाची बाब आहे. ग्रामीण भागातील तपासणी चाचण्यांचा वेग वाढविल्याने रूग्णसंख्या वाढत आहे. रूग्ण वाढले तरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, जिल्हा प्रशासनाने रूग्णांवर वेळेत उपचार करून मृत्यूदर आटोक्यात ठेवण्यावर भर द्यावा. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. बाहेर गावी जाणे, लग्नसमारंभ, भाजी बाजार, वाढदिवस, अंत्यविधी, याठिकाणी होणारी गर्दी टाळा. दंड, लॉकडाऊन कोरोनावर उपाय नाही, प्रत्येकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असेही थोरात म्हणाले. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बाल विकासमंत्री डॉ.यशोमती ठाकूर,जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा पोलीस यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound