महामार्गावर धावत्या दुचाकीने अचानक घेतली पेट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील महामार्गावर धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने दुचाकी जळून खाक झाल्याची घटना शुक्रवार १० मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही.

 

प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नशिराबाद गावातील रहिवाशी हे आपल्या कामाच्यानिमित्ताने शुक्रवार १० मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकीने राष्ट्रीय महामार्गावरून जळगाव शहराकडे निघाले होते. नशिराबाद गाव सोडल्यानंतर पुढे अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर चालत्या मोपेड दुचाकीने अचानक पेट घेतला. दुचाकीने पेट घेताच याचे रूपांतर आगीत झाले. अवघ्या काही मिनीटातच दुचाकी जळून खाक झाली होती. दुचाकीने पेट घेतल्याचे कारण समजू शकले नाही. परंतू सुदैवाने दुचाकीधारकाच्या लक्षात आल्याने त्यांनी दुचाकी बाजूला लावून स्वत:चा बचाव केला आहे. याघटनेबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content