तरूणाची सव्वा तीन लाखांची ऑनलाईन फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तरुणाचा हरविलेला मोबाईलचा दुरुपयोग करून अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने बँकच्या खात्यातून परस्पररित्या ३ लाख २९ हजार २९९ रूपये वर्ग करून फसवणूक केल्याचा प्रकार सामोर आला आहे. याबाबत जळगाव सायबर पोलीस ठाण्यात मंगळवारी ५ जुलै रोजी दुपारी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल सुकलाल पवार (वय-२८) रा. भोंडन दिगर ता. पारोळा जि. जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. २३ जून रोजी त्याचा मोबाईल गहाळ झाला होता. या संदर्भात त्यांनी कुठेही पोलिसात तक्रार दिली नव्हती. दरम्यान अज्ञात व्यक्तीने गहाळ झालेल्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने बँक डिटेल घेऊन आणि एटीएमच्या मदतीने परस्पर ३ लाख २९ हजार २९९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करून रक्कम काढून घेतली आहे. हा प्रकार २३ जून ते २६ जून दरम्यान घडलेला आहे. याप्रकरणी तरुणाने तातडीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी ५ जुलै रोजी दुपारी दीड वाजता सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस लाईन लीलाधर कानडे करीत आहे.

Protected Content