मुक्ताईनगरात स्कूल बसला धडकला ट्रक : अपघातांचे सत्र सुरूच

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील प्रवर्तन चौकात मिनी ट्रकने स्कूल बसला धडक मारल्याची घटना आज घडली असून यातून अवजड वाहनांच्या वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मुक्ताईनगर शहरातून जाणार्‍या महामार्गावर अनेकदा लहानमोठे अपघात होत असतात. काही दिवसांपूर्वी स्टेट बँकेजवळ अपघात झाला होता. यानंतर आज मुख्य चौक अर्थात प्रवर्तन चौकामध्ये आयशर ट्रकने स्कूल बसला धडक दिली. सुदैवाने यात कुणाला जखम झाली नसली तरी शहरातील सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मुक्ताईनगर शहरातून जाणारे अवजड वाहने हे अनेकदा वेगाने धावत असतात. त्यांना आवर घालण्याची काम पोलीस प्रशासन करत असते. मात्र अनेकदा ही वाहने जोरदार वेगाने धावत असल्याने अपघातांचा धोका कायम असतो. यामुळे शहरात काही ठिकाणी बॅरिकेडींग केले तर याला व पर्यायाने अपघातांना आळा बसू शकतो. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Protected Content