Home क्राईम यावलमध्ये गुटखाबंदीची उघड पायमल्ली; खुलेआम विक्री

यावलमध्ये गुटखाबंदीची उघड पायमल्ली; खुलेआम विक्री

0
109


कर्करोगासारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या गुटख्यावर शासनाने बंदी घातली असतानाही जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे अवैध विक्रेत्यांचे मनोबल वाढल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. काही ठिकाणी कारवाया होत असल्या तरी त्या अपुऱ्या आणि केवळ दिखावूपुरत्या असल्याचा आरोपही केला जात आहे.

दरम्यान, राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून अवैध गुटखा विक्रीविरोधात कठोर कारवाई सुरू असताना यावलमध्ये मात्र बंदी असलेला गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने “गुटखाबंदीची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत प्रभावी आहे?” असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

नागरिकांनी पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाने केवळ किरकोळ विक्रेत्यांवर नव्हे, तर या अवैध व्यवसायामागील मुख्य पुरवठादार आणि साखळीवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच यावल शहर व तालुक्यात विशेष तपास मोहीम राबवून नियमित छापे, गुन्हे दाखल करणे आणि युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound