कर्ज फेडण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवाजीनगर हुडको येथील विवाहितेला माहेरहुन कर्ज फेडण्यासाठी दीड लाख रुपये आणावे, यासाठी पतीकडून छळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी नगर दालमील परिसरातील माहेर असलेल्या रुबीनाबी शोएब शेख (वय-२२) यांचा विवाह शिवाजीनगर हुडको येथील शोएब जावेद शेख यांच्याशी रीतीरीवाजानुसार झालेला आहे. दरम्यान लग्नाच्या सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती शोएब शेख याने पत्नीला माहेरीहून कर्ज फेडण्यासाठी दीड लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेच्या आईची परिस्थिती हालाखीच्या असल्यामुळे पैसे आणले नाही, याचा राग मनात धरून घरातील काम जमत नाही असे सांगून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याला विरोध केला असता विवाहितेला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. याबाबत मंगळवारी ५ जुलै रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी ६ वाजता शहर पोलीस ठाण्यात पती शोयब जावेद शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक करुणा सागर करीत आहे.

 

Protected Content