प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लग्न; कुटुंबीयांसह मंडप व्यावसायिकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । कंजरवाड्यातील जाखनी नगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. या क्षेत्रामध्ये कुठल्याही समारंभास परवानगी नाही असे असतानाही या ठिकाणी मंडप टाकून लग्न समारंभाचा कार्यक्रम करणाऱ्या कुटुंबियांसह मंडप व्यावसायिकांविरोधात रविवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंजरवाड्यातील जाखनी नगर या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये मंडप टाकून लग्न सोहळ्याचा कार्यक्रम होत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विनायक लोकरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक फौजदार अतुल वंजारी, ललीत गवळे, विश्वास बोरसे व सचिन पाटील या कर्मचार्‍यांना कारवाईसाठी रवाना केले. कर्मचाऱ्यांनी माहिती घेतली असता जाखनी नगर परिसरातील रहिवासी संजय सावन बाटुंगे यांची मुलगी साक्षी बाटुंगे हिच्या लग्ना निमित्ताने हा मंडप टाकण्यात आला असल्याची माहिती मिळाली. प्रतिबंधित क्षेत्रात कुठलाही समारंभ साजरा न करण्याचे आदेश असतांनाही जिल्हाअधिकाऱ्यांचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलिसांनी संजय सावंत बाटुंगे यांच्यासह मंडप व्यावसायिक गणेश नंदू बागडे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content