दिलासादायक : जिल्ह्यात आज कोरोनाचे ७६ रूग्ण आढळले; ४३८ रूग्ण कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून कोवीड रूग्णांची दिलासादायक आकडेवारी आज सायंकाळी प्राप्त झाली आहे. यात जिल्ह्यात आज ७६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेत तर ४३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर -८, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-११, अमळनेर-११, चोपडा-१३, पाचोरा-२, भडगाव-२, धरणगाव-०, यावल-९, एरंडोल-२, जामनेर-३, रावेर-१, पारोळा-१०, चाळीसगाव-२, मुक्ताईनगर-०, बोदवड-१ आणि अन्य जिल्हा ० असे एकुण ७६ रूग्ण आज आढळून आले आहे.

तालुकानिहाय आडेवारी

जळगाव शहर -११,५०९, जळगाव ग्रामीण-२४५८, भुसावळ-३६२०, अमळनेर-४२५९, चोपडा-४२५५, पाचोरा-१८७८, भडगाव-१८३२, धरणगाव-२१४५, यावल-१६६५, एरंडोल-२७८४, जामनेर-३८६०, रावेर-२०८२, पारोळा-२४५३, चाळीसगाव-३३६१, मुक्ताईनगर-१६३६, बोदवड-७९७ आणि अन्य जिल्हा ४०८ असे आज एकुण ५१ हजार ००२ रूग्ण झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. रिकव्हरीचा रेट हा ९२.४५ टक्क्यांपर्यंत आला आहे. जिल्ह्यात एकुण  ५१ हजार ००२  रूग्ण आढळून आले असून ४७ हजार १५३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज ५ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण जिल्ह्यात १२२६ रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे. तर जिल्ह्यात आता २ हजार ६२२ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

Protected Content