दोन्ही मित्रांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पुण्यात शिक्षण घेत असलेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू झाला असून रात्री त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबतचे वृत्त असे की, रोहित श्यामसुंदर मणियार (वय २१, रा. गांधीनगर) व समीर विलास काळे (वय २३, रा. जुने जळगाव) या जळगावातील दोन तरूणांचा पुण्यात अपघाती मृत्यू झाला. काल पहाटे कात्रजच्या पुलाजवळ झालेल्या अपघातात हे दोघे मित्र ठार झाले. काल रात्री दोघांचे मृतदेह जळगावात पोहोचले. रात्री दोघांवर अंत्यसंस्कार झाले.

समीर काळे याने अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर तो पुढे जर्मनीला उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणार होता. तत्पूर्वीच समीरचा अपघातात मृत्यू झाला. समीरच्या आई शीतल ह्या बुधवारी पुण्यातच होत्या. समीरने सायंकाळी त्यांना जळगावकडे जाणार्‍या ट्रॅव्हल्समध्ये सोडले होते. त्या जळगावात पोहोचण्याच्या आधीच समीरचा अपघातात मृत्यू झाला. दोन्ही तरूणांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली असून रात्री उशीरा त्यांच्या पार्थिवावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Protected Content