माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना श्रद्धांजली

जळगाव, प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वयाच्या ९१ व्या बुधवारी रुग्णालयात उपचारादरम्यान दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांना जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.

डॉ. शिवाजीराव निलंगेकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी,काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डी जी पाटील, आमदार शिरीष चौधरी, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटी,ल महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यासह सर्व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी अतिशय भावुक वातावरणात डॉ.शिवाजीराव निलंगेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच एनएसयूआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी शब्दांजलीच्या माध्यमातून स्वर्गीय शिवाजीराव निलंगेकर यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत अतिशय भावूक वातावरणात भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Protected Content