यावल रावेरच्या केळी उत्पादक शेतकरी पिक विमा निकष आंदोलनास कृषी पदवीधर संघटनेचा पाठिंबा

यावल प्रतिनिधी । रावेर आणि यावल केळी उत्पादक शेतकरी यांना न्याय मिळावे या दृष्टीकोणातुन पिक विम्याचे निकष बदलण्यात यावे या संदर्भात चे विभागीय पातळीवर आंदोलनाची सुरूवात डॉ कुंदन फेगडे यांच्या नेतृत्वात खाली करण्यात आली आहे.

सदर या केळी उत्पादक शेतकरी बांधवांना न्याय मिळुन देण्यासाठी शासन दरबारी पुकारण्यात येत असलेल्या या आंदोलनाला यावल आणि रावेर तालुक्यातील कृषी पदवीधर संघटनेने पाठिंबा दिलेला आहे. अशा आशयाचे पत्र कृषी पदवीधर संघटनेचे यावल आणि रावेर पदाधिकारी यांनी डॉ कुंदन फेगडे यांना दिले आहे या प्रसंगी कृषी पदवीधर संघटनेचे यावल तालूका अध्यक्ष अमरदिप गजरे,यावल तालूका उपाध्यक्ष :आका़श निळे .यावल तालूका संघटक : सोहम कोळंबे .रावेर तालूका अध्यक्ष गिरीश भोगे . रावेर तालूका उपाध्यक्ष :गौरव पाटील,रावेर तालूका सचिव शुभम महाजन .रावेर तालूका संघटक : यश पाटील यांनी एक लेखी पत्र यावलचे नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांना दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी व न्याय मिळेपर्यंत देण्यासाठी आपला हा लढा सुरू राहील असे डॉ . कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे .

Protected Content