Home Cities यावल जे. टी. महाजन पॉलिटेक्निकमध्ये प्राध्यापक भरती; २९ जुलै रोजी विविध अभियांत्रिकी शाखांसाठी...

जे. टी. महाजन पॉलिटेक्निकमध्ये प्राध्यापक भरती; २९ जुलै रोजी विविध अभियांत्रिकी शाखांसाठी वॉक-इन मुलाखत

0
2

फैजपूर ता. यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील टेक्निकल अँड मेडिकल एज्युकेशन सोसायटी संचलित जे. टी. महाजन पॉलिटेक्निक येथे विविध अभियांत्रिकी शाखांतील प्राध्यापक (Lecturers) पदांसाठी २९ जुलै २०२६ रोजी वॉक-इन मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

महाविद्यालयात सिव्हिल अभियांत्रिकी, कॉम्प्युटर अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच मेकॅनिकल अभियांत्रिकी या शाखांमध्ये प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण देण्यासाठी सक्षम व अनुभवी अध्यापकांची निवड करण्याच्या उद्देशाने ही भरती करण्यात येत असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.

ही वॉक-इन मुलाखत बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या प्राचार्य कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहताना सविस्तर बायोडाटा (Resume) तसेच सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तांत्रिक शिक्षण क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही भरतीची संधी महत्त्वाची मानली जात आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाला प्राधान्य देणाऱ्या जे. टी. महाजन पॉलिटेक्निकमध्ये अध्यापनाची संधी मिळविण्यासाठी इच्छुकांनी वेळेत मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेबाबतची माहिती संस्थेचे प्राचार्य प्रा. पी. एम. राणे, सचिव व्ही. आर. झोपे आणि अध्यक्ष एस. जे. महाजन यांनी प्रसिद्ध केली असून, पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.


Protected Content

Play sound