२० लाखांचा आकडा पार, गायब आहे मोदी सरकार ; राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने वीस लाखांचा टप्पा ओलांडला आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर ‘२० लाखांचा आकडा पार, गायब आहे मोदी सरकार’, अशा शब्दात टीका केली आहे.

 

देशात कोरोनाचा फैलाव होण्याचा वेग हा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज ५० हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत. दुसरीकडे राहुल गांधी यांनी १७ जुलैरोजी केलेल्या ट्विटमध्ये याच वेगाने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत गेला तर १० अॉगस्टपर्यंत २० लाखांहून अधिक लोक बाधित होतील. त्यामुळे याबाबत सरकारने सुनियोजित पावले उचलण्याची गरज असल्याचे म्हटले होते. आता राहुल गांधी यांनी केलेले भाकीत खरे ठरले आहे. कारण देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ७ अॉगस्ट रोजीच वीस लाखांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, कोरोनाबाबत अपडेट देणाऱ्या एका संकेतस्थळानुसार गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ६२ हजार रुग्ण सापडले आहेत. तर एकूण रुग्णसंख्या २०.२५ लाखांहून अधिक झाली आहे.

Protected Content