राष्ट्रपती राजवटीचे वृत्त राज्यपालांच्या कार्यालयाने फेटाळले

bhagat singh koshyari 1567320794

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली असे वृत्त दूरदर्शन न्यूजने दिले आहे. परंतू अशा स्वरुपाची शिफारस केली नसल्याचे स्पष्टीकरण राज्यपालांच्या कार्यालयातून देण्यात आले आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट शिफारस केल्याचे वृत्त दूरदर्शनने दिले होते. शिवाय त्यांनी यासंदर्भातील अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला दिल्याचे म्हटले होते. परंतु अशी कोणतीही शिफारस राज्यपालांनी केली नसून सायंकाळनंतर निर्णय घेतला जाईल, असे राजभवनच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. राज्यपाल रात्री 8.30 पर्यंत वाट पाहतील. जर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, असं वृत्त होते. परंतु राष्ट्रपती राजवटीबाबत कोणतीही शिफारस केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाची तात्काळ बैठक बोलवली होती. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातच ही बैठक असल्याची चर्चा असल्यामुळे चर्चेला उधान आले होते.

Protected Content