सरकारचा शपथविधी होईपर्यंत शरद पवारांचे काही सांगता येत नाही : बच्चू कडू

bachhu kadu Sharad Pawar 696x364

मुंबई (वृत्तसंस्था) नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत शरद पवारांचे काहीही सांगता येत नाही. ते काहीही करू शकतात. काय ते आम्हालाही सांगता येणार नाही. कारण, जे अजित पवारांना कळत नाही ते आम्हाला कसे कळणार,’ असे वक्तव्य ‘प्रहार’ संघटनेचे नेते व अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनी शिवेसनेला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे.

 

शरद पवारांचे काहीही सांगता येत नाही. ते काहीही करू शकतात. कारण, जे अजित पवारांना कळत नाही ते आम्हाला कसे कळणार?. भाजपा आणि शिवसेनेची युती होईल असे वाटले होते. त्यामुळेच त्यांना पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीसोबत जाण्याची आमची मानसिकता नव्हती. पण हा बदल आता स्विकारला पाहिजे. राजकारणात काहीही होऊ शकते. पण जे काही होत आहे ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी होत आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी मला संपर्क केला होता. पण मी उद्धवजींना शब्द दिलेला होता. शब्दापेक्षा महत्त्वाचे काहीही नसते. त्यामुळे मी त्यांचा प्रस्ताव नाकारल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली.

Protected Content