सुरेश प्रभू यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना भारतीय जनता पक्षातर्फे उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत लवकर घोषणा होऊ शकते.

अतिशय अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून सुरेश प्रभू ओळखले जात होते. १९९६ मध्ये ते राजापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. यानंतर याच मतदारसंघाचे त्यांनी २००९ पर्यंत प्रतिनिधीत्व केले. वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी वन व पर्यावरण मंत्री म्हणून काम केले होते. तसेच ते नदीजोड प्रकल्पाचे अध्यक्ष देखील होते.

दरम्यान, राजकीय विजनवासात असतांना नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली त्यांना राज्यसभेवर पाठवून नंतर अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली. केंद्र सरकारमध्ये वाणिज्य मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालय अशा महत्त्वांच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. यानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. मात्र आता भाजप उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही सुरेश प्रभू यांना रिंगणात उतरवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कालच सुरेश प्रभू यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Protected Content