यावर्षी देखील निकाल उशिराची शक्यता

जळगाव / मुंबई लाइव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – गेल्या दोन वर्षापूर्वी संसर्ग प्रादुर्भावामुळे सर्वच परिवहन सेवा ठप्प होती त्यामुळे १० वी व १२ वी च्या उत्तरपत्रिका तपासणीविना पडून असल्यामुळे बोर्डाचे निकाल उशिराने लागले होते. परंतु विनाअनुदानीत शिक्षकांनी त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी यावर्षी १० वी व १२ वी च्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांनीच नकार दिला असून या उत्तरपत्रिका परत पाठविल्या आहेत. या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पोस्ट तसेच अन्य ठिकाणी पडून आहेत. त्यामुळे यावर्षी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल उशिराने लागण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात तसेच राज्यात बहुतांश ठिकाणी १० वी १२ वीच्या परीक्षा सुरु आहेत. ज्या विषयांच्या परीक्षा झाल्या आहेत त्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी संबंधित शिक्षकांकडे पाठविल्या जात आहेत. विंना अनुदानित शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचा इशारा या शिक्षक संघटनांनी यापूर्वीच दिला होता. त्यानुसार विनाअनुदानित शिक्षकांनी त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी या उत्तरपत्रिका तपासनीस नकार दिला असून पुन्हा परत पाठविल्या आहेत. त्यामुळे या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पोस्ट कार्यालय व अन्य शाळामध्ये पुन्हा परत आले असून तपासणीविना पडून आहेत.

वेळोवेळी विना अनुदानित शिक्षकांनी त्यांच्या मागण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला असला तरी शासनाने त्यांच्या मागण्याची दखल घेतलेली नाही व पूर्तता देखील केलेली नाही त्यामुळे या उत्तरपत्रिका तपासणी विना पडून असल्याने १० वी १२ वीचे निकाल उशिराने लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जोपर्यंत शासन विनाअनुदानित शिक्षकांच्या न्याय्य मागण्याचा विचार होऊन निर्णय होत नाही तो पर्यंत उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार आंदोलन सुरूच राहणार असल्याचे विंना अनुदानित शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Protected Content