बंड फसले असते तर एकनाथ शिंदेंनी . . .केसरकरांच्या गौप्यस्फोटाने खळबळ !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

आज दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सनसनाटी गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, आमदारांनी केलेल्या उठाव यशस्वी झाला नसता, तर एकनाथ शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती. वर्धापनदिनाच्या दिवशीच एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला. त्यांना खालच्या दर्जाची वागणूक दिली. त्यांचा अपमान का केला?, असा सवाल दीपक केसरकर यांनी  उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

 

दीपक केसरकर पुढे म्हणाले, अस्मितेसाठी एकनाथ शिंदेंनी बंड केलं. उद्धव ठाकरे वचन द्यायचे आणि तोडायचे. एकनाथ शिंदे यांनी निश्चितपणे उठाव केला. नंतर एकनाथ शिंदेंना वाटलं, ही सर्व लोक माझ्याबरोबर प्रेमाने आली आहे. कारण, शिंदेंचा अपमान झाला, तो दिवस वर्धापनदिनाचा होता. एकनाथ शिंदे हे विधिमंडळाचे नेते होते. त्यांचा अपमान का केला? याचं उत्तर दिलं पाहिजे. एकनाथ शिंदे रागवून गेले असते, तर परत येण्याची तयारीही दाखवली होती, असेही दीपक केसरकरांनी सांगितलं. माझ्यामुळे एकाही आमदाराचं राजकीय नुकसान होता कामा नये, प्रसंगी जीव गेला तरी चालेल. असं म्हणणार्‍या माणसाच्या मागे लोक उभी राहणार नाहीत, तर कोणाच्या राहणार, असेही दीपक केसरकरांनी म्हटले.

Protected Content