पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी उपचारासाठी मिळाले एक लाख रूपये !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रेल येथील रहिवासी भानूदास नथ्थू पाटील यांना हृदयरोगावरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रूपयांचा मदत निधी मिळाला असून यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रयत्न केले होते. या माध्यमातून त्यांना मोठी मदत झाली आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आजवर मुख्यमंत्री सहायता निधीतून मतदारसंघातील विविध रूग्णांना उपचारांसाठी पाच कोटी रूपयांपेक्षा जास्तची मदत मिळवून दिली आहे. या अनुषंगाने रेल ता. धरणगाव येथील रहिवासी भानुदास नथ्थू पाटील यांना अलीकडेच एक लक्ष रूपयांची मदत मिळाली आहे. त्यांना हृदयविकाराचे निदान झाले असून पुणे येथील राममंगल हार्ट फाऊंडेशनच्या रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना या संदर्भात माहिती दिली. यानंतर पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे त्यांना उपचारासाठी एक लक्ष रूपयांची सहायता मिळाली आहे.

Protected Content