चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत विरोधात शिवसेनेची तक्रार

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव जिल्हा व शिवसेना महानगर शिवसेनेतर्फे अभिनेत्री कंगना राणावत विरोधात पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे निवेदनामार्फ़त तक्रार करण्यात आली. तसेच कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि तिचा पद्मश्री पुरस्कारही मागे घ्यावा, अशी मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली.

चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतने ‘भिक मागून मिळाले स्वातंत्र्य’ हे वादग्रस्त विधान केले आहे. देशभरातून कंगना राणावत विरोधात कारवाईची मागणी होत आहे. याच धर्तीवर जिल्हा व शिवसेना महानगर शिवसेनेतर्फे कंगना राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, अल्पसंख्यांक प्रमुख जाकीर पठाण, महानगर प्रमुख कायदे आघाडी अॅड. राजेश पावसे, महिला महानगरप्रमुख शोभा चौधरी, मंगला बारी, सरिता माळी,कोल्हे, उप महानगरप्रमुख प्रमुख प्रशांत सुरळकर, उहेश चौधरी, गणेश गायकवाड, किरण भावसार, शोयब खाटीक, विकास तायडे, राजेश वारके, हरीश भोलाने, विहेंद्र कोळी, फारुक शेख, वसीम खान आदी उपस्थित होते.

Protected Content