गोलाणी मार्केट परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरातून तरूणाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी गुरूवारी २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, किरण अंकूश उंडे (वय-३१) रा. अयोध्या नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता किरण उंडे हा त्याची दुचाकी (एमएच १९ बीवाय ७८९०) ने जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात आला होता. त्याने दुचाकी गोलाणी मार्केट परिसरात पार्कींग करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने परिसरात दुचाकीचा शोध घेतला. परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर गुरूवारी २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश बोरसे करीत आहे.

Protected Content