आसोदा रोडवरील दोन घरांना भीषण आग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आसोदा रोडवरील मोहन टॉकीजजवळ लोखंडी चुलीतील जळती राखेमुळे पार्टेशनच्या दोन घरांना भीषण आग लागल्याने दोन कुटुंबातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. अग्नीशमन विभागाच्या बंबाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील आसोदा रोडवरील मोहन टॉकीजजवळ सुमन भालचंद्र ओतारी आणि पमाबाई राजेंद्र ओतारी यांचे शेजारी शेजारी लाकडी पाट्यांचे पार्टेशनचे घर आहे. नेहमीप्रमाणे दोन्ही कुटुंबातील सदस्य हे कामासाठी शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरातून निघून गेले होते. त्यानंतर साडे नऊ वाजेच्या सुमारास पार्टेशन घरातच्या पाठी मागे असलेल्या लोखंडी चुल होती. या चुलीत जळती राख असल्याने अचानकपणे पार्टेशनच्या एका आग लागली. घरातून धुर निघत असल्याचे एका वृध्द व्यक्तीच्या लक्षात आले. त्यांनी नागरीकांच्या मदतीने पाहणी केली असता घराच्या मागच्या बाजून दोन घरांना मोठी आग लागली होता. स्थानिक नागरीकांनी तातडीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या घटनेची माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन विभागचे तीन बंब घटनास्थळी दाखल आले व आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान, या घरांच्या आजूबाजूला देखील अशाच प्रकारचे पार्टेशनचे घरे असल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला, मात्र दोन्ही कुटुंबाच्या घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले आहे. शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे अधिक्षक श्रीकांत बारी, उप अग्निशमन अधिकारी सुनिल मोरे, चालक युसूफ पटेल, कर्मचापरी पन्नालाल सोनवणे, नितीन बारी, भारत बारी आणि गंगाधर कोळी यांनी परिश्रम घेतले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा नुकसानीबाबत पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

Protected Content