सलून पार्लर दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या; नाभिक समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या काळात गेल्या दीड वर्षांपासून लॉकडाऊनमुळे सलून व पार्लर दुकाने बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. नाभिक समाजाच्या प्रश्नांकडे सहानुभूतीपुर्वी लक्ष देवून सलून व पार्लर दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी आज नाभिक समाजातर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले.

निवेदनात असे म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या राज्यातील पुरणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेला लॉकडाऊनमुळे नाभिक व्यवसायिकांनी आपले सलून पार्लर आणि स्पा 20 मार्चपर्यंत स्वतःहून बंद ठेवले होते. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे ही सलून पार्लर उभारण्यासाठी कर्ज घेऊन या व्यवसायिकांनी सुरू केले असून गेल्या दीड वर्षात उत्पन्नाचे साधनच बंद झाल्याने कौटुंबिक घरच्यांसोबत आर्थिक गरजा कशा पूर्ण कराव्यात हा प्रश्न आता नाभिक समाजातील प्रत्येक कुटुंबा प्रमुखाससमोर पडला पडला आहे.

हातावर पोट असणारे कारागीर आणि त्यांच्या आर्थिक गरजांचे गणित या दुकानांवर वरच आहे. या दुकानासाठी घेतलेले कर्ज त्याचे हप्ते यासाठी बँका तर थांबल्या नाहीत, तसेच दुकानांसाठी घेतलेल्या वीजमीटर चे बिल देखील भरावे लागणारच आहे. तसेच काही व्यवसायिकांनी भाडेतत्त्वावर दुकाने घेतली असून त्या दुकानाचे भाडे मात्र सुरूच आहे अशी सर्व बाजूंनी आर्थिक कोंडी झालेली नाभिक समाजाचे झालेल्या आर्थिक कोंडी त्यांची व्यवसायाचे ठिकाण असलेले सलून पार्लर उघडून थांबू शकते.

आज महाराष्ट्राचा विचार करता मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरांपेक्षा जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट खूपच खाली आलेला आहे. मात्र असे असतानाही या शहरांमध्ये सलून पार्लर व स्पा सुरू ठेवण्यात आले. मात्र पॉझिटिव्हिटी रेट कमी असताना जळगाव जिल्ह्यात मात्र सलून पार्लर बंद आहे या गोष्टींचाही विचार व्हावा.

आम्ही सर्व व्यावसायिक आपणास विनंती करतो की, व्यवसाय करतांना आम्ही योग्य ती शासन मान्यता असलेली नियमावली तयार करून आमची व आमच्या घरात त्यांची काळजी घेण्याची दक्षता घेऊ, स्वच्छता, सोशल डिस्टंसिंग, तसेच वेळोवेळी सॅनिटायझेशनची काळजी घेण्यात येईल. नाभिक समाजाने आजवर कोणत्याही मागण्यासाठी व आर्थिक मदतीसाठी शासन दरबारी हात पसरले नाही. मात्र हातावर पोट असताना केवळ आमच्या हाताला काम मिळावे आणि त्यातून आमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्याकरता आमचे सलून पार्लर उघडण्याची आम्हाला परवानगी द्यावी व स्वाभिमानाने आणि स्वकष्टाने जगण्याची आमची इच्छा पूर्ण करावी याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले आहे.

यावेळी निवेदन देताना जळगाव जिल्हा नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नेरपगारे, जगदीश वाघ, राजकुमार गवळी, कमलेश निकम, नाना बोरसे, जयंत महाले, उदय पवार, नागेश चौधरी, संजय पाटील, प्रीती निकम, अर्चना जाधव, अर्चना माळी, लीना निकम आदींची उपस्थिती होती.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.