विद्यापीठातील अब्दुल पिंजारी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल येथील रहिवाशी आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे वरिष्ठ सहाय्यक हाजी अब्दुल पिंजारी हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असून त्यांचा प्र.कुलगुरू डॉ. के.वायुनंदन यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

हाजी अब्दुल पिंजारी हे विद्यापीठात गेल्या २९ वर्षांपासून सेवा देत आहे. मितभाषी, शांत स्वभावाचे तसेच सर्वांना मदत करणारे अशी त्यांची विद्यापीठात ओळख आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. के. वायुनंतद यांनी त्यांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला. यावेळी विद्यापीठातील प्र. कुलसचिव डॉ. शा. रा .भादलीकर, डॉ. पवार यांच्या सह शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content