मनपास्तरीय नेहरू हॉकी चषक स्पर्धा संपन्न

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिका व हॉकी जळगावच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या जळगाव शहर महानगरपालिका स्तरीय आंतरशालेय नेहरू हॉकी चषक स्पर्धा जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात संपन्न झाली

या स्पर्धेत १५ वर्षातील मुलांच्या स्पर्धेत गोदावरी इंग्लिश स्कूल विजयी तर विद्या इंग्लिश स्कूल उपविजेते ठरले. १७ वर्षे मुलांच्या गटात गोदावरी स्कूल विजयी तर अँग्लो उर्दू हायस्कूल उपविजय ठरले. १७ वर्षाआतील मुलींच्या गटात जी. डी. बेंडाळे महाविद्यालय विजयी तर गोदावरी इंग्लिश स्कूल उपविजेते ठरले.

उद्घाटन समारंभ –

जळगाव शहर महानगरपालिकेचे नगरसेवक तथा कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू नितीन बरडे यांच्या हस्ते व हॉकी महाराष्ट्राचे फारुख शेख यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्यक्ष हॉकी खेळून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

पारितोषिक वितरण समारंभ –

या क्रीडा महोत्सवाचे पारितोषिक वितरण समारंभासाठी महिला बचत गटाच्या तथा महाराष्ट्र राज्याच्या ‘बेटी बचाव बेटी पढाव’च्या माजी समन्वयक प्रा. डॉ.अस्मिता पाटील यांच्या हस्ते व जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून हॉकी महाराष्ट्राच्या डॉ. अनिता कोल्हे, हॉकी जळगावचे प्रमुख फारुख शेख, क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर, स्पर्धेचे क्रीडा समन्वय सय्यद लियाकत अली, गोदावरीचे क्रीडा संचालक आसिफ खान, अँग्लोचे वसीम मिर्झा, बेंडाळे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका छाया चिरमाडे आदींची उपस्थिती होती

स्पोर्ट हाऊसतर्फे चषक तर क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे प्रमाणपत्र –

विजयी व उपविजयी संघातील खेळाडूंना सुवर्ण व रजत पदक तसेच विजयी व उपविजेते संघास नेहरू चषक स्पोर्ट्स हाऊस जळगाव तर्फे देण्यात आले तर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांनी शासकीय प्रमाणपत्र दिले.

स्पर्धेचा निकाल –

१५ वर्षाआतील मुलेउपांत्य सामना

विद्या इंग्लिश स्कूल वी वी अंगलो उर्दू स्कूल (१-०)

अंतिम सामना

गोदावरी इंग्लिश स्कूल वी वी विद्या इंग्लिश स्कूल (४-०)

१७ वर्षाआतील मुले उपांत्य सामना – 

१) अंग्लो उर्दू स्कूल वी वी विद्या इंग्लिश स्कूल (१-०)

२) गोदावरी इंग्लिश स्कूल वी वी मिल्लत उर्दू स्कूल (३-०)

अंतिम सामना –

गोदावरी स्कूल वी वी अँग्लो उर्दू स्कूल (१-०)

१७ वर्षाआतील मुली

१) गोदावरी स्कूल वी वी अँगलो उर्दू स्कूल (१-०)

२) बेंडाळे कॉलेज वी वी विद्या इंग्लिश स्कूल (१-०) पेनोल्टी

अंतिम सामना

३) बेंडाळे कॉलेज वी वी गोदावरी स्कूल (२-०) पेनल्टी

स्पर्धा यशस्वीतेसाठी कार्यरत पंच –

स्पर्धेत पंच म्हणून लियाकत अली, शादाब सय्यद, मुझफ्फर शेख, इम्रान शेख, चेतन माळी, धीरज जाधव, दिनेश ओडिया, इद्रिस शेख, दिवेष चौधरी यांनी काम केले.

Protected Content