महावितरणच्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन

मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारास पाठीशी घालणाऱ्या महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.

तालुक्यात पूर्णाड १३२ केव्ही येथून दुई, कर्की/कोठा येथे उच्च दाब वाहिनी ३३ केव्ही पुरवठा करण्याकरता सुरू असलेल्या कामांमध्ये विद्युत खांब व विद्युत तारांच्या अंदाजपत्रकाला तिलांजली देऊन निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारास पाठीशी घालणाऱ्या महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल काळे, सचिन पाटील, श्याम दांडगे, प्रफुल पाटील, गणेश दुट्टे, अभिषेक पाटील, मधूकर भोई, श्रीराम भोई, मंगेश कोळी, गजानन पाटील, निखिल पाटील, दिलीप पाटील, दिलीप कांडेलकर, राहुल वाघ, योगेश परीसकर, मुकेश झाल्टे, प्रेम कोळी, विशाल कांडेलकर, मयूर यमनरे, पप्पू संदनशीव त्यांची आंदोलनाला उपस्थिती होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content