नांद्रा येथे “शेतकरी मायबाप” पुस्तकाचे यांच्याहस्ते प्रकाशन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्‍यूज प्रतिनिधी ।  नांद्रा येथील जि. प. प्राथमिक शाळेत झालेल्या कवी स्वप्निल बाविस्कर यांच्या “शेतकरी मायबाप” या पुस्तक प्रकाशन सोहळा हा कवी प्रा. वा. ना. आंधळें यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

ज्ञानदेव खेड्यात जन्मले अन प्रतिकुलतेत वाढले म्हणून त्या प्रज्ञा सूर्याकडून विश्वाच्या देवाला वाहिलेली विश्वशांतीची प्रार्थना’पसायदान’सारखे काव्य जन्माला आले. ७०० वर्ष झालीत पण पसायदान आजही घरा घरात व मनामनात आहे. ही कवितेची ताकद आहे. म्हणूनच कविंचे स्थान आजही समाजात असामान्य आहे असे सांगत कवी स्वप्निल बाविस्कर यांच्या शेती मातीच्या घाम कष्टाच्या कवीतांची दखल घेत बाविस्कराच्या सुजाण सौंदर्यावर चांगलाच प्रकाश टाकला. पुढे कवी प्रा. वा. रा. आंधळे असे म्हणतात कविता ह्या वाडमय प्रकारचे महत्व त्यांनी जुन्या व नव्या कवितांच्या भाव सौंदर्यासह होणाऱ्या संस्काराचे सुंदर स्पष्टिकरण दिले. प्रचंड वाचन असणाऱ्या प्रा. आंधळेंनी सत्तर मिनिटे श्रोत्यांना हसवले आणि रडवलेही.

नांद्रा येथील जि. प. प्राथमिक शाळेत झालेल्या कवी स्वप्निल बाविस्कर यांच्या “शेतकरी मायबाप” या पुस्तक प्रकाशन सोहळा हा कवी प्रा. वा. ना. आंधळें यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक मोरसिंग राठोड, अशोक बाविस्कर, सरपंच अमोल सुर्यवंशी, उपसरपंच शिवाजी तावडे, माजी मुख्याध्यापक एस. पी. तावडे, ग्रा. पं. सदस्य किशोर पाटील, विनोद बाविस्कर, साहेबराव तावडे, जि. प. चे मुख्याध्यापक राजेंद्र गोसावी, एस. के. पाटील, वाय. पी. पाटील, माजी मुख्याध्यापक ठाणसिंग पाटील , जगदीश महाजन , देविदास पवार, नाना पवळ, नाना साखरे, पत्रकार नागराज पाटील, राजेंद्र पाटील, प्रा. यशवंत पवार, यांच्या सह महेश गवादे, पी. एस. चौधरी, गजानन ठाकूर, केशव पेंटर, माधव पाटील, ज्ञानेश्वर साखरे, अभियंता राजेश राठोड, यांच्या सह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी १९९८ व्या मंथन गृपचा गेट टुगेदर कार्यक्रम पार पडला. यात स्वप्निल बाविस्कर, विकास खैरनार, नंदकिशोर पाटील, दिपक सुर्यवंशी, भरत पाटील, अलिम पटेल, सुरेश पाटील, श्रीराम पवार, करूणा भालेराव, अलका पाटील, मनिषा गवादे यांच्या सह माजी विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी आत्माराम बाविस्कर, सुनिल बाविस्कर, पंकज बाविस्कर, प्रकाश नारायण गणेश बाविस्कर यांनी परीश्रम घेतले. सुत्रसंचलन गजानन ठाकूर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कवी स्वप्निल बाविस्कर यांनी मानले.

 

Protected Content