गतीरोधक बसविण्यासाठी जयहिंद लेझीम मंडळाचे लाक्षणिक उपोषण

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव – चांदवड महामार्गावर भारत डेअरी स्टॉप ते पांडव नगरीपर्यंत शहरातील चौकात तसेच महामार्गाला जे – जे उपरस्ते मुख्य शहरात किंवा कॉलनी मध्ये जाण्यासाठी जोडले आहेत अशा ठिकाणी गतिरोधक तातडीने बसवावे या मागणीसाठी जयहिंद लेझीम मंडळाचे एका दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दरम्यान, आमदार किशोर पाटील आणि  नगरपालिकेचे गटनेते संजय वाघ यांच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित करण्यात आले.

 

जळगाव – चांदवड महामार्गावर भारत डेअरी स्टॉप ते पांडव नगरीपर्यंत शहरातील चौकात तसेच महामार्गाला जे – जे उपरस्ते मुख्य शहरात किंवा कॉलनी मध्ये जाण्यासाठी जोडले आहेत अशा ठिकाणी गतिरोधक तातडीने बसवावे, महामार्गावरील वाढती रहदारी व त्यामुळे होणारे अपघात यांच्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अनेकांचे अपघातात प्राण गेले आहेत व अनेक कर्त्या तरुणांना आपला जीव यात गमवावा लागला आहे. या विषयासंबंधी अगोदर ही अनेक मागण्या तसेच निवेदने प्रांताधिकारी कार्यालय पाचोरा व सार्वजनिक बांधकाम विभागात दिली गेली परंतु यावर कोणत्याही स्वरूपाची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे शहरातील जयहिंद क्रिडा व लेझीम मंडळातर्फे २५ आॅगस्ट रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

 

पोषणात मनोज महाजन, प्रदिप वाघ, शिवश्री पाटील, अश्विनीकुमार महाजन, प्रशांत धनगर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, अॅड. अविनाश सुतार, शुभम महाज, भुषण पाटील, पवन जाधव, रविंद्र पाटील, मयुर महाजन, राजेंद्र गुजर, भोला पाटील, ईश्वर मराठे, संजय पाटील, मा. नगरसेवक बापु हटकर, साहेबराव महाजन, दिपक ब्राह्मणे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख, यांचेसह जयहिंद क्रिडा व लेझीम मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपोषणात सहभागी झाले होते. उपोषणस्थळी नगरपालिकेचे मा. गटनेते संजय वाघ, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, पोलिस निरीक्षक राहुल खताळ, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी भेटी दिल्या.

 

अखेर आ. किशोर पाटील व संजय वाघ यांच्या आश्वासनाने सुटले उपोषण

जळगाव – चांदवड महामार्गावर तातडीने गतिरोधक बसवावे, गतिरोधक बसवितांना ते वाहतूक नियमाप्रमाणे असावे त्यावर कलरचा पट्टा व चमकणारे स्टिकर लावले जावे जेणेकरून वाहनचालकांना रात्री लांबुन दिसण्यास मदत होईल, महामार्गावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, महामार्गावरील पथदिवे रात्रीच्या वेळी नेहमी चालु असावे. या प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठी जयहिंद क्रिडा व लेझीम मंडळाने २५ आॅगस्ट रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले होते. या प्रकरणाची दखल घेत नगरपालिकेचे मा. गटनेते संजय वाघ यांनी उपोषणस्थळी भेट देवुन उपोषण कर्त्याचे म्हणणे ऐकुन घेतले. संजय वाघ यांनी तात्काळ प्रांताधिकारी भुषण अहिरे यांची भेट घेवुन मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपल्या स्तरावरुन प्रयत्न करावेत यासंदर्भात सखोल चर्चा केली. पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देवून उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे नॅशनल हायवेचे अभियंता थोरात व तदनंतर जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे घटनांचे गांभीर्य पटवुन दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी येत्या १५ दिवसात मागण्या पूर्ण होणार असल्याचे सांगितल्या नंतर उपोषण सोडण्यात आले.

Protected Content