बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील रस्ता दुरूस्तीची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल शहरापासून गेलेल्या बुऱ्हाणपूर ते अंकलेश्वर हा प्रमुख मार्ग दोन राज्यांशी महाराष्ट्राला जोडणारा महामार्गावरील रस्त्यात ठिकठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली  आहे. या खड्ड्यांमुळे लहान मोठे होत असून भीषण आपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 

या विषयावर प्रशासनाला कधी जाग येइल असा प्रश्न यावल व रावेर तालुक्यातील नागरीकांना पडला असुन, या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ,मनसे ,वंचीत बहुजनआघाडी यांच्यासह विविध संघटनांच्या वतीने तक्रारी देखिल करण्यात आली आहे. रावेर-यावल-चोपडा या सुमारे ९० किलो मिटर वरील प्रमुख रहद्दारीच्या राज्य महामार्गावरील रस्त्याच्या मध्यभागी असो किंवा डाव्या उजव्या बाजुला असो मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे.  या खड्डयांमध्ये पावसाळयातील पाणीमुळे साचल्याने वाहनधारकांना खुड्डयांचा अंदाज घेता येत नसल्याने वारंवार वाहनधारकांच्या वाहनांचे अपघात होवून त्यांना विविध शारीरिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.

 

रावेर ,यावल ,चोपडा या राज्य महामार्गावरून मागील काही वर्षापासुन परप्रांतातुन येणाऱ्या अवजड वाहनांची मोठी वर्दळ झाली असुन अपघातास हे देखील मोठे कारण असल्याचे वाहनधारकांकडून बोलले जात आहे. तसेच मंजूर झालेल्या त्या ६१ कोटी रूपयांच्या निधीचे काय ? झाले असा सवाल देखील केला जात आहे.  काही दिवसापुर्वी शासना कड्डन रस्ता दुरूस्तीसाठी ६१ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. त्या निधीचे काय झाले कुठले रस्ता दुरूस्त झाले, असा प्रश्न नागरीकांमध्ये उपस्थित करण्यात आहे. लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे कधी लक्ष देणार असा सवाल आता उपस्थित होत आहे .

Protected Content