विद्यार्थ्यांनी बारावीपर्यंत मोबाईलचा वापरू नये – प्रांताधिकारी डॉ. थोरबोले

yawal news1

यावल प्रतिनिधी । आपल्या विद्यार्थ्यांनी बारावीचे शिक्षण पुर्ण होईपर्यंत कोणीच मोबाईलचा वापर करू नये कारण तुमचे पुढचे शैक्षणिक भविष्य हे खराब होऊ शकते व येणारी दहावी आणी बारावीची परीक्षा ही कापी मुक्त होणार आहे, तरी या दृष्टीकोणातुन सर्व विद्यार्थ्यानी आजपासुन अभ्यासाला लागावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी विद्यार्थ्यांना केले.

तालुक्यातील हिंगोवा येथील प्रभात विदयालयात गुणवंत विधार्थांचे वार्षीक गुणगौरव सत्कार सोहळा नुकताच पार पडला, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन फैजपुर विभागाचे प्राताधिकारी डॉ.अजित थोरबोले हे होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. तसेच नंतर दहावी आणी बारावी मध्ये प्रथम आलेल्या गुणवंत विदयार्थाचा सत्कार करण्यात आला. मुख्यध्यापक यांनाही विधार्थ्यांना सुचना दिल्यात, त्याचप्रमाणे शिक्षकांनी देखील चांगले शिक्षण दिले पाहीजे कारण त्यांचे पुढचे भविष्य चांगले झाले पाहीजे असे त्यानी मार्गदर्शन करतांना सांगितले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेक्रटरी अशोक फालक, संचालक गोविदा इंगळे, हिरामण नेहेते, गोपाळ गाजरे, युनूस हाजी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर, कर्मचारी, विदयार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोळी सर यांनी केले व आभार संदीप पाटील यांनी व्यक्त केले.

Protected Content