यावल पंचायत समिती गटविकास अधिकारीपदी मंजुश्री गायकवाड

यावल प्रतिनिधी | येथील यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदाची सुत्रे मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांनी स्विकारली आहे .

यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांची कळवण नाशिक येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त असलेले पदावर काही काळ भुसावळचे गटविकास अधिकारी विलास भाटकर यांच्याकडे प्रभारी गटविकास अधिकारी पदाची सुत्रे सोपविण्यात आली होती .

मराठवाडयातील उस्मानाबाद हे मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांचे माहेर असून धुळे हे त्यांचे सासर आहे. त्यांनी सोलापूर व पंढरपूर येथून आपल्या प्रशासकीय सेवाकार्याची सुरूवात केली असून जळगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी तीन वर्ष सेवा केली आहे . कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळाल्याने यावल तालुक्यातील, ग्रामीण क्षेत्रातील प्रलंबित विविध विकास कामांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

Protected Content