Home क्राईम माशांचे जेवण न दिल्याच्या शुल्लक कारणावरून मित्राची दगडाने ठेचून हत्या ; फैजपूर...

माशांचे जेवण न दिल्याच्या शुल्लक कारणावरून मित्राची दगडाने ठेचून हत्या ; फैजपूर पोलिसांकडून दोन्ही आरोपींना तात्काळ अटक

0
14


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालोद येथे दारूच्या नशेत माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका मित्राची दगडाने डोक्यात मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत हत्येचा छडा लावून दोन्ही आरोपींना अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले आहे. रमेश ईश्वरसिंग भावर (वय ३५, रा. खंडवा, मध्य प्रदेश) असे मृत मजुराचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत रमेश भावर आणि आरोपी हे दोघेही मजुरीचे काम करत असून त्यांच्यात चांगली मैत्री होती. तिघेही एकत्र दारू पिण्याच्या सवयीचे होते. घटनेच्या दिवशी रात्री सुमारे ८:०० ते ८:३० वाजेच्या सुमारास तिघेही भालोद येथे एकत्र बसून दारू पीत होते. मृत रमेश याने स्वतःच्या पैशाने मासे विकत आणून ते मुकेश नावाच्या मित्राकडे जेवण तयार करण्यासाठी दिले होते. त्यावेळी आरोपी सूरज कोळी याने रमेशकडे स्वतःच्या वडिलांनाही माशांचे जेवण देण्याचा हट्ट धरला. यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.

दारूच्या नशेत या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. संतापलेल्या आरोपी सूरज कोळी आणि सूरज ऊर्फ गोलू नेमाडे या दोघांनी संगनमत करून रमेश भावर याच्या डोक्यात भक्कम दगडाने जोरदार प्रहार केले. या गंभीर मारहाणीत रमेशचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मयताचा मृतदेह नजीकच्या एमएससीबी (MSEB) कार्यालयापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असलेल्या एका खड्ड्यात फेकून दिला आणि तिथून पोबारा केला.


Protected Content

Play sound