फैजपूर येथे ईव्हीएमविरोधात भारिपचे आंदोलन

phaijapur aandolan

फैजपूर प्रतिनिधी । येथील भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष अमर मेढे यांच्या नेतृत्वाखाली प्रांतधिकारी यांना (दि.१७ जून) रोजी निवेदन देण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’ असा नारा देत. येत्या, विधानसभेत ईव्हीएम द्वारे मतदान न करता बॅलेट पेपर द्वारा मतदान व्हावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकामध्ये काही मतदार संघात आलेल्या मतदानापेक्षा अधिक मते मिळाली. तर इतर मतदार संघात कमी मतदान निघाले. १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये लोकांचा लोकशाहीवर विश्वास असतांना ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून देशातही हूकुमशाही येत असल्याच्या भावना लोकांना वाटत आहे. तरी निवडणूक आयोगाने यामध्ये पुढाकार घेऊन भविष्यात होणाऱ्या सर्व निवडणूका बॅलेट पेपरवर घ्याव्यात. जेणेकरुन लोकांच्या मनामध्ये असलेला संशय दूर होईल. अशी मागणी भारिप फैजपूर शहराध्यक्ष अमर मेढे यांनी प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून साळुंके यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते इमरान भाई, गोल्डन मेढे, अजय मेढे, सागर भालेराव, शुभम कोचुरे, अमोल तायडे व सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content