यावल येथील सीआरपीएफ जवान मोहन येउल यांची सेवानिवृत्ती

यावल प्रतिनिधी । येथे कै. पुंडलिक येउल यांचे सूपुत्र  मोहन येउल (मेजर) यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलातून (सीआरपीएफ) सुमारे २४ वर्षे आणि ०६ महिन्यांच्या सेवेनंतर दि.३१ ऑगस्ट रोजी निवृत्त झाली आणि आज (दि.२) रोजी सुखरूप घरी परतले आहे.

सैनिक मोहन येउल यांनी आसाम, जम्मू कश्मीर,त्रिपुरा, पंजाब, महाराष्ट्र मध्ये पुणे सेंटर तथा नक्सली प्रभावित क्षेत्र झारखंड आणि शेवटी छत्तीसगढला तैनात राहुन  देशसेवा केली. आपली सेवा सम्पन्न करून आपल्या गावी आपल्या घरी परतणाऱ्या या सैनिकाचे यावल येथील नागरीकांनी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात जल्लोषात त्यांचे स्वागत केले. 

सेवानिवृत्त सैनिक येउल स्वागत करून शुभेच्छा  देणाऱ्या मध्ये मित्र विजय बारी, रविन्द्र पाटील, ईश्वर बारी, अनिल बारी, संजय बारी आणि बारी समाज मित्र परिवार यांनी शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी मोहन येउल यांचे शाळकरी वर्ग मित्र राहुल महाजन, प्रशांत वसंत पाटील, शरद बारी, उमेश बोरसे, नवाज तडवी, अॅड बिपिन पाटील, भूषण बागुल, महेश नेवे, विजय पवार, विजय लावने, प्रशांत रणधीरे सेवानिवत्ति सैनिक संजय पाटील, सैनिक अमोल भोईटे, विरावली येथील देश सेवा बजावणारे सैनिक जवान महेन्द्र पाटील यांनी ही येउल यांना सेवापुर्ती पर शुभेच्छा दील्या आहेत. 

 

Protected Content