यावल येथील खड्डेमय रस्त्यांची दुरूस्तीच्या कामाला आजपासून सुरूवात

यावल प्रतिनिधी । बऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रास्ता रोको आणि श्राध्दा आंदोलन केले होते. आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने आज मंगळवारी १४ सप्टेंबर सकाळी १० वाजेपासून खड्ड्याचे तात्पुरत्या कामास सुरूवात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष किशोर नन्नवरे , विभागाचे अध्यक्ष आबिद कच्छी, तालुका उपाध्यक्ष शाम पवार, आकाश चोपडे , प्रतिक येवले, कमलेश शिर्के, राज शिर्के, गणेश माळी, कुणाल बारी यांनी सोमवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात होत आहे.   या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जहॉगीर तडवी यांनी तात्काळ दखल घेत तात्पुरत्या स्वरूपात या खड्डे पडलेल्या मार्गावर खडीकरणाव्दारे दुरूस्ती करण्यात येत असल्याने मनसेच्या पदधिकारी यांच्यावतीने आभार मानले जात आहे.  तात्काळ या मार्गावरील नादुस्त झालेल्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात यावे अशी ही आग्राहाची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे .

Protected Content