राष्ट्रध्वजाचा मान राखा – हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षी सरकारच्या वतीने हर घर तिरंगामोहीम राबवण्यात येत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. तरी राष्ट्रध्वजाची विटंबना होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य पाऊले उचलावीत. अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता असून दि. १५ ऑगस्ट या दिवशी अनेकजण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात मात्र हेच कागदी आणि प्लास्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचर्‍यात किंवा गटारात पडलेले आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लवकर नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते, तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायदाबाह्य ठरते. तरी स्वातंत्र्यदिनाच्या दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलावीत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षी सरकारच्या वतीने हर घर तिरंगामोहीम राबवण्यात येत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. तरी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलावीत, अशी मागणी करणारी निवेदने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यावल तालुक्यात प्रशासन, पोलीस आणि शाळा महाविद्यालय याना देण्यात आली. यासंदर्भात यावल येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार संतोष पी.विनंते  यांना आणि पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना निवेदन देण्यात आले.

यावलमधील सरस्वती विद्यामंदिर, कै. सीताबाई दामोदर देवकर, बाल संस्कार विद्या मंदिर, गुरुमाई मुलींचे विकास विद्यालय, सरदार वल्लभभाई पटेल, कन्याशाळा, साने गुरुजी विद्यालय व महाविद्यालय, जे टी महाजन इंग्लिश स्कूल, कला वाणिज्य महाविद्यालय व अट्रावल येथील २ शाळा, हिंगोणा येथील ३ शाळा, फैजपूर येथील 2 शाळा, सावदा येथील २ शाळा, डोंगर कठोरा येथील २ शाळा यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने धीरज भोळे, चेतन भोईटे यांच्यासोबत विशाल बारी, मयूर महाजन, खेमराज करांडे, सौ. छाया भोळे, सौ. मनीषा भोळे, प्राजक्ता वाणी, तेजल नेवे, चैताली गाजरे, श्रुती राजपूत, प्रणव राजपूत, रुपेश पाटील धर्मप्रेमी उपस्थित होते.

या संदर्भात हिंदू जनजागृती समितीच्या खालील मागण्या आहेत –

1. शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रबोधन करणारी कृती समिती स्थापन करावी. त्यामध्ये हिंदु जनजागृती समितीचाही समावेश करावा, अशी विनंती आहे. समिती या राष्ट्रसेवेस तत्पर आहे.

2. जिल्ह्यात कुठेही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन आणि त्याची विक्री होते का ?, याची खात्री करावी. असे होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी.

Protected Content