अ.भा.गुजर देव सेनेच्या राष्ट्रीय सल्लागारपदी हिरालाल चौधरी यांची निवड

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील वनोली येथील रहिवाशी तथा कृउबाचे माजी सभापती व विद्यमान संचालक हिरालाल चौधरी यांची अखिल भारतीय गुजर देव सेना राष्ट्रीय सल्लागार म्हणून राष्ट्रीयध्यक्ष धन्नालाल जितेंडवा यांनी नियुक्ती केली असून तसे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.

त्यांची निवड झाल्याबद्दल पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, जि.प. माजी अध्यक्ष नंदू महाजन, पी.सी. आबा पाटील, अॅड.जी. के. पाटील, चंद्रशेखर पाटील, चोपडा कृउबा सभापती कांतीलाल पाटील, धुळे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष के. डी. पाटील, चोपडा माजी सभापती गोकुळ पाटील, इंदिराताई पाटील, गुजर देव सेनेचे प्रदेशाध्यक्ष डी.के. पाटील, जिल्हा सचिव अरुण पाटील, भुसावळ तालुका प्रमुख उमाकांत पाटील यांच्यासह गुजर समाज बांधवांनी व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Protected Content